पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

◾परिचय :- राजमाता अहिल्याबाई होळकरांची संपूर्ण जीवन गाथा

इमेज
                   अहिल्याबाई होळकर.                एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण प...

◾बोधकथा :- दानवीर कर्ण

इमेज
कुंतीचा जेष्ठ पुत्र अंगराज कर्ण प्रत्येक दिवशी सुवर्ण दान करत असे. त्यामुळे त्याची ख्याती दानवीर अशी झाली होती. महाभारताच्या युद्धात त्याला वीरगती प्राप्त होऊन जेंव्हा तो स्वर्गात गेला तेंव्हा त्याला तिथे आदराची वागणूक मिळाली, सत्कारपूर्वक वागविण्यात आले. देवराज इंद्राने त्याचे स्वागत केले. सुवर्णजडीत महालात त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्या महालात सर्व वस्तू सोन्यापासून बनविलेल्या होत्या. हे पाहून राजा कर्णाला आपण जीवनभर केलेल्या सुवर्ण दानाचा गर्व झाला. काही वेळ सोन्याच्या पलंगावर विश्रांती घेतल्यावर कर्णाला तहान लागली. त्याने सेवकाला पाणी आणण्यास सांगितले. सेवकाने सोन्याच्या पेल्यात पातळ झालेले सोन्याचे पाणी आणून दिले. कर्णाला मनातल्या मनात खूप राग आला. परंतु तो काहीच न म्हणता तहानलेलाच झोपला. संध्याकाळी भोजनाच्या वेळी सेवक सोन्याच्या ताटात सोन्याची पोळी, सोन्याची भाजी घेवून आला तेंव्हा मात्र ते पाहून कर्ण संतापला. तो तातडीने देवराज इंद्राकडे गेला. त्याने त्रस्त होवून इंद्राकडे तक्रार केली कि इथे पाणी मागितले तर सोन्याचे आणि अन्न हि सोन्याचे असे का?. देवराज इंद्राने उत्तर दिले,...

◾जीवन मंत्र :- कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे

इमेज
मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!… कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा ही खालील  सुत्रे आहेतः - 1)  सतत पॉझीटीव्ह - कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. 2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्या...

◾कविता :- अंतरीच्या वेदना

इमेज
✏संकलन, शनिवारीय 'काव्यस्तंभ' कविता स्पर्धा ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖    ‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'शनिवारीय काव्यस्तंभ' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖   🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗       ☄विषय : अंतरीच्या वेदना☄     🍂शनिवार : २९ / मे /२०२१🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ अंतरीच्या वेदना जीवन गाणे गात गात पुढे पुढे मी चालणार अंतरीच्या वेदना असह्य हसत हसतच झेलणार...!!१!! सुंदर सुंदर जग निर्मिले खरंच विधात्याची कमाल काटेरी जीवन जगताना संयम धैर्य माझी ढाल...!!२!! मायबापाची माया गेली डोंगराएवढे दुःख झाले काटेरी जीवनात आज गुलाब बनायचे ठरवले...!!३!! दुःख ठेवून काळजात अश्रुला आज रोकायचे संस्कार आईचे आठवून कर्तव्य सारे बजवायचे...!!४!! अंतरीच्या वेदना माझ्या गती वाढवतील पायाची भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ शिकवण लाख मोलाची..!!५!! ✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड   कवयित्री/लेखिका/हायकूकार  ©सदस्या-मराठीचे शिलेदार समूह ➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿ अंतरीच्या वेदना कुणी ना जाणिल्या अंतरीच्या वेदना, घातली कधी ना फुंक...

◾बोधकथा :- महत्व

इमेज
एका आश्रमात एक महात्मा राहत होते. सोबत त्यांचे काही शिष्यपण होते. काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरु होती. महात्मा त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आणि आपले विचारही व्यक्त करत होते. या दरम्यान महात्म्याच्या नजरेस काही तरी पडले व ते त्या दिशेने जावू लागले. त्यांनी ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका शिष्याला सांगितले. दुपारी जेंव्हा महात्मा आपल्या कुटीत परत आले तेंव्हा त्यांनी त्या शिष्याला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या कापसाबद्दल त्याला विचारले असता तो शिष्य म्हणाला,"तुम्ही सांगितलेला कापूस मी उचलला खरा पण काही काळाने मी कचरा समजून तो फेकून दिला. आता तो कचराकुंडीत असेल. " महात्मा म्हणाले,"अरे ! मी या कापसाऐवजी तुला धन किंवा सोने दिले असते तर असेच कचराकुंडीत टाकले असते का? तो कापूस बाहेर उघड्यावर पडला याचा अर्थ कापूस जिथे ठेवला आहे तेथुन कापूस बाहेर वाऱ्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने बाहेर कसा पडला? शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेल्या कोणत्याही गोष्टी अशा जर थोड्या थोड्याने जर वाया जावू लागल्या तर आपल्या बरोबर समाजाचेहि नुकसान यातून होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर...

◾कविता :- नंदनवन...

इमेज
               नंदनवन                 झालेत फार वाद भरून आला ऊर, या विवादात सुटला आसवांचा पुर....!!   कोणतीही गोष्ट चटकन मिळण्याची लागली हाव, उद्या नाही आज,आज नाही आता असा झालाय भाव….!! तुटला आहे धीर संपली सगळी आशा, आपुलकीच्या नात्यामधली  कुठे गेली अभिलाषा….!! मानवाच्या सटीक बोलण्याने वाढत आहे मतभेद, शांत स्वभावी विचाराने कमी होतील मनातील तेढ….!! तूटलेली नाती नव्याने हवी जुळायला तेव्हाच म्हणता येईल  सुरुवात झालीय नंदनवन फुलायला….!! रचना भूषण वसंतराव बोबडे मु.पो.ता.कोरपना. जि. चंद्रपूर मो नं.7030109369,         8080502076. _________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾जीवन मंत्र :- श्रीमंती...

इमेज
'श्रीमंती' संजय धनगव्हाळ ******************       श्रीमंत व्हावस कोणाला वाटत नाही,प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतो,पण सर्वांनाच श्रीमंती मिळते असे नाही.काही वडिलोपार्जित श्रीमंतीचा वारसा चालवत असतात तर काही कष्ट,मेहनतीने श्रीमंती मिळवत असतात.तर काही प्रयत्नाशी परमेश्वर अस म्हणून श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. आता श्रीमंत अधीक श्रीमंत झाला तर त्याचे काही वाटतं नाही,पण एखादी कष्टाने श्रीमंत झाला असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच  असतो.श्रीमंत आणि गरीब या आयुष्याच्या दोन बाजु आहेत. त्याप्रमाणे माणूस जगतं असतो,गरजेपुरता पैसा असला तरी खुप झालं. म्हणजे आहे त्यात समाधान माणून सुखासुखीनी जगणारेही ते त्यांच्या पुरते श्रीमंत असतात आणि श्रीमंतीच्या श्रीमंतीत लोळण घेणारेही श्रीमंतच असतात. दोघांच्याही श्रीमंतीत तफावत असली तरी समाधानाने जगण्यात खरी श्रीमंती असते.दोघांची दिनचर्या वेग वेगळी,दोघांचे जगणेही वेगळे असते.पण श्रीमंताच्या चेहऱ्यावर श्रीमंत असण्याचा लवलेश असतो,तर श्रीमंत नणाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव असतो.पण पैसा असतो तरच त्याला श्रीमंत म्हणायचं का ? सम...

संदीप माहेश्वरी विषयी अधिक त्याच्याच ब्लॉग मधून...नक्की वाचा | sandee maaheshwari

इमेज
      मेनू मागील पुढे व्यक्ती यश, आनंद आणि समाधानाच्या शोधात धडपड, अपयशी आणि पुढे गेलेल्या लाखो लोकांपैकी  संदीप माहेश्वरी  हे एक नाव आहे.  इतर मध्यमवयीन मुलाप्रमाणेच त्याच्याकडेसुद्धा अस्पष्ट स्वप्ने आणि आयुष्यातील ध्येयांची अस्पष्ट दृष्टी होती.  त्याला धरुन ठेवण्याची शिकवण देणारी नम्रता वृत्ती होती.  चढ-उतारांचा त्रास होत असतानाच, त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ शिकविला. आणि एकदा शोधल्यानंतर, तो सतत आपल्या कम्फर्ट झोनमधून राजीनामा देत राहिला आणि आपल्या यशाचे रहस्य संपूर्ण जगाला सांगत राहिला.  लोकांना मदत करण्याचा आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा हा आग्रह आहे ज्याने  "विनामूल्य जीवन बदलणारे सेमिनार आणि सत्र"  या रूपात लोकांचे जीवन बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रेरित केले  . लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत आणि त्याचे 'सामायिकरण' हे ध्येय कोट्यवधी लोकांचा आतापर्यंत सक्रियपणे प्रचार आणि अभ्यास केला जात आहे यात आश्चर्य नाही.  हे त्याचे परिश्रमीचे लक्ष आहे, त्याच्या कुटुंबाचे मोठे समर्थन आणि त्याच्या कार्यसंघाचा व...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण